HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याचं मुख्यमंत्री पद स्वीकारताना ‘लय भारी’ वाटलं – मुख्यमंत्री

मुंबई | महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. नुकतंच ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. यावेळी सरकारला १ वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षाचं पान उलटताना कसं वाटत आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे म्हणाले की, आज जे काही आम्ही आहोत ते सगळ्यांसमोर आहोत.

खरं म्हणजे शासन, प्रशासन या पठडीतला मी नाही. आमचं घराणं सेवाव्रती आहे. महाराष्ट्राची सेवा करणारी ही आमची सहावी पिढी. मी माझ्या आजीला म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आईला कधी पाहिले नाही. पण माझे आजोबा सांगायचे, की माझ्या आजीला असं वाटायचं की आपल्या मुलाने गव्हरमेंट सर्वंट व्हावे. माझ्या आजीच्या मुलाने म्हणजे शिवसेनाप्रमुखांनी गव्हरमेंट स्थापन केले आणि त्यांचा नातू म्हणजे मी गव्हरमेंट चालवत आहे. दरम्यान, महापालिका अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे केवळ मुंबईचे महापौर निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करायला मी महापालिकेच्या सभागृहात जात होतो.

मुख्यमंत्रीपदाच्या कामाला सुरुवात. केल्यानंतर कोरोनाचे संकट आले. गेल्या १०० वर्षानंतर आलेलं हे महाभयानक संकट होतं. त्यात माझ्या तिन्ही पक्षांच्या सहकार्याने आणि जे सरकारचे समर्थक आहेत त्यांनी मला सहकार्य केले. त्यामुळे मी काम करू शकलो. अगदी समजून उमजून आम्ही कारभार करत आहोत.

प्रशासन चालवणे हे वेगळं कौशल्य आहे…

विशेष म्हणजे प्रशासन म्हटल्यानंतर सगळी सचिव मंडळी आली. काही सचिवांची माझी आधी ओळख होती. मात्र सगळेच सचिव माझ्या परिचयाचे नव्हते. मात्र सगळ्यांनी मला सहकार्य केले. त्यांच्याही मनात एक असं होतं की, चला आता वातावरण मोकळं झालं, चांगलं झालं, आता कामाला लागुया! सगळ्यांचं सहकार्य लाभलं म्हणून हे एक वर्ष पार पडलं. आणि मला आत्मविश्वास आहे की पुढची ४ वर्ष पण नक्कीच आम्ही पार करू. पुढच्या ५ वर्षाचं जनता ठरवेल.

महाराष्ट्र हे देशाला दिशा दाखवणारं, मार्गदर्शन करणारं, प्रेरणा देणारं राज्य आहे. अशा राज्याचं मुख्यमंत्री पद स्वीकारताना ‘लय भारी’ वाटलं का?

– लय भारी आहे नक्कीच आहे. पण तसं दडपण माझ्यावर कधी आलं नाही. याचं कारण आता सत्ता उपभोगली नसली तरी सत्ता जवळून पाहत आलो. शिवसेनाप्रमुखांमूळे पहिल्यापासून हा अनुभव घेत आलो. साधारण सत्ता काय असते हे जवळून पाहत आलो.

तुमच्या जीवनात वर्षभरात काय बदल झाला?

वर्षभरात एक मोठा बदल झाला तो म्हणजे मी माझ्या शिवसैनिकांपासून अर्थात त्यांच्या भेटीपासून दुरावलो. प्रत्यक्ष भेटीचा दुरावा जाणवतो. याचं कारण मुख्यमंत्री पद नाही तर कोरोना आहे. हे जे आपण बिल्ले लावून बसलो आहे माझी कुटुंब माझी जबाबदारी यामुळे सगळ्यांच्या भेटी थांबल्या होत्या. पण गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटायला सुरुवात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार भाषणाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या नावानं का करत नाहीत? राज ठाकरेंचा बोचरा सवाल

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचा जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश

Gauri Tilekar

भाजपातर्फे राज्यभरात घंटानाद, शंखनाद आंदोलन!

News Desk