HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपची दारे २४ तास खुली !

मुंबई | शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपची दारे २४ तास खुली, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आम्ही लवकरात लवकर सरकार स्थापन करून, असा दावा देखील पाटलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. भाजपने आज (५ नोव्हेंबर) फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलविली होती.

तब्बल दोन तासाच्या बैठकीनंतर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपची दारे २४ तास खुली आहे. मात्र, शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आले नसल्याचे देखील पाटलांनी यावेळी नमुद केले.” देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला. संपूर्ण भाजप फडणवीस यांच्या पाठिशी असल्याचे पाटांनी सांगितले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता १३ दिवस उलटूनही अद्याप सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्री पदा आणि सत्तेचे समान वाटपावरून संघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकार परिषदे घेऊन भाजपवर निशाणा साधत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नवाब मलिक पोस्ट करू शकतात, पण…!” – मुंबई उच्च न्यायालय

News Desk

बुलडाणा जिल्ह्यात पाच रूग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

News Desk

मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात अनेक वर्ष राजकारण केलं, भाजपचा गंभीर आरोप

News Desk