HW News Marathi
महाराष्ट्र

कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन

मुंबई | वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक झाली असून आज (२६ नोव्हेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत असून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिला आहे.

मुंबईत वांद्रे येथे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आहे. आंबेडकर गार्डनपर्यंत मोर्चा काढल्यानंतर मनसे नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की, “कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करायचं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा राज ठाकरेंचा सक्त आदेश आहे. कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही”.

दरम्यान पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईसंबंधी बोलताना ते म्हणाले की, “पोलिसांना त्यांचं काम करावं लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा असे सरकारचे आदेश आहेत. लोक मरण्यापेक्षा वाचलेली बरी म्हणून ते आमची काळजी घेत आहेत. उलट आम्ही त्यांचे आभार मानतो. पण आम्हीदेखील स्वत:च्या जीवाची काळजी घेत आहोत”.

‘हा सामान्यांच्या नेतृत्वातला मोर्चा आहे त्यामुळेच शांत आहे. यानंतर सरकार काहीतरी निर्णय घेईल,” अशी अपेक्षा बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे. तसंच राज ठाकरे पुढील भूमिका जाहीर करतील असंही सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगरसेवकांना प्रवासासाठी मिळणार हेलिकॉप्टर ? 

News Desk

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणी तिघांना २० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा

News Desk

लॉकडाऊनचे योग्य नियोजन नाही, सोनिया गांधींची पंतप्रधानांवर टीका

News Desk