HW News Marathi
देश / विदेश

श्रीनगरमधील बाजारात ग्रेनेड हल्ला, १५ जण जखमी तर एकाचा मृत्यू

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. हा ग्रेनेड हल्ला श्रीनगरच्या मौलाना आझाद मार्गावरील बाजारात आज (४ नोव्हेंबर) दुपारीच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १५ जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी भरगर्दी असलेल्या बाजारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आली आहे.

यापूर्वी २७ ऑक्टोबरला दिवाळीच्या पूर्वसंध्येला श्रीनगरमधील करन नगर भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ १४४ बटालियनवर ग्रेनेड हल्ला केला होता. यात ६ जवान जखमी झाले होते. त्यामुळे गेल्या महिन्याभरातील हा दुसरा ग्रेनेड हल्ला आहे. तर गेल्या आठवड्यात कुलगाम येथे दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला होता. या गोळीबारात ६ मजूर जखमी झाले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या मते SCAM म्हणजे सपा, काँग्रेस, अखिलेश व मायावती  

News Desk

जैश-ए-मोहम्‍मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्‍वीकारलेली नाही !

News Desk

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी CBIकडे, बिहार सरकारची मागणी पूर्ण

News Desk