HW News Marathi
देश / विदेश

कॅबिनेट बैठक, राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी आम्ही सर्व नियमांचे पालन केले आहे !

मुंबई |“धनंजय मुंडे हे फायटर आहेत. ते लवकरच कमबॅक करतील”, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी बीडमधील एका लॅबच्या उदघाटन कार्यक्रमाला त्याचप्रमाणे कॅबिनेटच्या मिटींगला, राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला देखील धनंजय मुंडे उपस्थित होते. याच पार्श्ववभूमीवर भीती व्यक्त होत असताना आता आरोग्यमंत्र्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. “मंत्रिमंडळ बैठक आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अशा दोन्ही ठिकाणी सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. मात्र, तरीही कोणालाही तशी लक्षणे आढळली तर तातडीने त्यांची चाचणी करण्यात येईल”, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार आम्ही कॅबिनेट बैठक आणि राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी सर्व नियमांचे काटेकोर पालन केले आहे. मात्र, तरीही लस येईपर्यंत सर्वांना खबरदारी ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे, कोणाला लक्षणे आढळली तर तातडीने चाचणी करता येईल”, असे राजेश टोपेंनी स्पष्ट केले आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात धनंजय मुंडेंचे २ स्वीय सहाय्यक, मुंबईतील आणि बीडमधील वाहन चालक, स्वयंपाकी यांचा समावेश आहे. मात्र, धनंजय मुंडेंसह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लक्षणे नाहीत. दरम्यान “धनंजय मुंडेंनी कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, त्यांना श्वसनाचा थोडा त्रास होऊ लागल्याने आता मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे”, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार

Aprna

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

Aprna

रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार दसऱ्यापूर्वी बोनस

News Desk