HW News Marathi
महाराष्ट्र

गोव्यात आघाडी सरकारची उभारणी करण्यासाठी शरद पवारांना मध्यस्थीसाठी विचारणार – दीपक केसकर

मुंबई | गोव्यात २०२२च्या विधानसभा निवडणुका आल्या आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीप्रमाणे गोव्यातही भाजपविरोधात आघाडी उभारण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मध्यस्थीसाठी विचारणा करण्यात येणार आहे. शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. एनडीटीव्हीनं याबाबत वृत्त दिले आहे.

“महाराष्ट्रातील महाविकास आघाडी प्रमाणे गोव्यात भाजपविरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना विचारणा करण्यात येईल. भाजपाने गोव्यातून प्रादेशिक पक्षांना संपवलं आहे. भाजपाच्या या भीषण वृत्तीला थांबवण्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. याद्वारे गोव्याला विभाजित करणारी धर्मनिरपेक्ष मतं वाचवली पाहिजेत,”असे केसकर म्हणाले आहेत.

उत्तर गोवा जो महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या जवळचा भाग आहे. या भागात शिवसेनेचं चांगलं स्थान आहे. याठिकाणी आगामी २०२२ मध्ये गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दोन ते तीन जागा जिंकू शकते, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गोव्यातही आघाडी सरकारची सत्ता प्रस्थापित होणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश

Aprna

राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर…रोहित पवारांचे चिराग पासवान यांना पत्र 

News Desk

“सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न, निर्णय लवकर जाहीर होणार”

News Desk