मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचा एका नगरसेवकाचा कोरोनामुळे प्राण गमावले आहे. गेल्या १५ दिवसांपासून एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराला २७ मे रोजी कोरोनाची लागण झाली होती.
या नगरसेवकाने त्यांच्या ट्वीटकरून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. नगरसेवकाने ट्वीटमध्ये म्हणाले, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसेवेचा वसा घेतलेल्या मला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली आहे. आपणा सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाच्या पुण्याईने मी लवकरच आपल्या सेवेकरिता पुन्हा रुजू होईन. तोपर्यंत सर्वांनी सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन आपापल्या घरी राहावे ही नम्र विनंती!,” असे आवाहन त्यांनी केले होते.
गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. अखेर आज (१० जून) त्यांचे निधन झाले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. दरम्यान, मिरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे , काल (९ जून) मृत्यू झाला आहे. शिवसेनेच्या या नगरसेवकावर ठाण्याच्या वेदांत रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आठवड्यापूर्वी या नगरसेवकासह त्यांची आई, बायको आणि भाऊ यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांच्या पत्नीला डिस्चार्ज देण्यात आला होता. तर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.