HW News Marathi
महाराष्ट्र

वीज बिल इतके हातात दिले की कोणी भरणार नाही, मग.. Penguin Gang ची पार्टी सुरु!’ नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा  

मुंबई | लॉकडाऊन काळातील वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण पेटून उठलं आहे. विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकावर जोरदार टीका होत आहे. अशात भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्वीट करत आघाडी सरकार आणि नाईटलाईवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

‘महाविकास आघाडी सरकारने नाईटलाईफ जास्तच मनावर घेतली आहे. यामुळे इतकं वीज बिल लोकांना आलं की कोणीच भरणार नाही. मग काय अंधारच अंधार होणार’ अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीट करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

सगळीकडे अंधारच अंधार झाला की Penguin Gang ची पार्टी सुरू असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढलाय. यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. तर नितेश राणेंच्या या ट्वीटला आघाडी सरकार कसं उत्तर देणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे.

काय आहे नितेश राणेंचं ट्वीट?

नितेश राणे हे नेहमी ट्वीट करत आघाडी सरकारवर घणाघाती टीका करत असतात. यावेळीही त्यांनी वाढीव वीज बिलावरून ठाकरे सरकार आणि आदित्य ठाकरे यांनी चिमटे काढले आहेत. ते ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘या महाविकास आघाडी सरकारने “NIGHTLIFE” जास्तच मनावर घेतले आहे असं दिसते..विज बिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार..आणि मग.. Penguin Gang ची पार्टी सुरु!!!’

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कीटकनाशक व्यवस्थापन कायदा -२०१७ तात्काळ अस्तित्वात आणा -महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनची मागणी

News Desk

“या सगळ्यांचे गॉडफादर उद्धव ठाकरे”, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप!

News Desk

राज्यपालांच्या विमान प्रवासावरुन राज्य शासनाने दिले स्पष्टीकरण

News Desk