HW News Marathi
Covid-19

स्थलांतरीत मजुरांसाठी ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूद वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून रोखले

मुंबई | कोरोना पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषत करण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मदत केल्यामुळे अभिनेता सोनू सूद कौतुक झाले. सोनू सूदच्या कामावर राजकारण टीका टप्पणी देखील झाली. पण, परप्रांतीय मजुरांना, कामगारांना सोनू सूदने त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली यावर राजकारण देखील झाले. परप्रांतीय मंजूर, कामगारांचा निरोप घेण्यासाठी सोनू सूद काल (८ जून) वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मवर पोहचला होता. मात्र, सोनू सूदला आरपीएफकडून रोखण्यात आले. त्यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

सोनू सूदला वांद्रे टर्मिनसमधून बाहेर पडल्यावर प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी का मिळाली नाही, हा प्रश्न विचरल्यारवर सोनू सूद म्हणाले, “मी परप्रांतीयांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. पोलिसांनी प्रवेश दिला असता तर बरे झाले असते. पण नाही दिला तरी फार फरक पडत नाही. लोक आपल्या घरी सुखरूप पोहोचावेत एवढीच माझी इच्छा आहे.”

सोनू सूदने परंप्रांतीय मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांची उत्तर प्रदेशच्या आजमगड येथे जाण्यासाठी ट्रेनची व्यवस्था केली होती. त्यामुळे सोनू सूद स्वत: या सर्वांना निरोप देण्यासाठी वांद्रे टर्मिनस येथे आला होता. मात्र, आरपीएफने सोनू सूदला प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून रोखण्यात आले. सोनू सूदने जवळपास ४५ मिनिट वांद्रे टर्मिनस येथील आरपीएफच्या ऑफिसमध्ये बसून पोलिसांशी चर्चा केल्यानंतरही परवानगी न मिळाल्याने त्यांनी मागे परतण्याचा निर्णय घेतला

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात ५० हजारांच्या पुढे रुग्ण झाले कोरोनामुक्त!

News Desk

बारामतीबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,अजित पवारांचा इशारा !

News Desk

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, भाजपचा खटाटोप सुरू | जयंत पाटील

News Desk