मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात दोन महिने लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. आता देशात तीन टप्प्या अनलॉक १.० सर्व सुरू करत आहे. आज (८ जून) अनलॉकचा तिसरा टप्पा असून देशात अनलॉकमध्ये हळूहळू सुरू करण्यात आले आहे. मात्र, यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सर्व सुरू झाले आहे. अनलॉक १.० मध्ये कंटेन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट्स आणि मॉल्स सुरू करण्यात अद्याप परवानगी दिली नाही.
A consultative meeting chaired by Chief Minister Zoramthanga decides to impose 2-week total lockdown in the state from 9th June 2020 in view of the prevailing situation. Lockdown guidelines will be notified shortly: Mizoram Government pic.twitter.com/vuvmP9ovop
— ANI (@ANI) June 8, 2020
दरम्यान, देशातील एक राज्य याला अपवाद ठरले असून,येथे लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आले आहे. मिझोराममध्ये दोन आठवड्यांचा लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील सध्याची परिस्थिती पाहून संपूर्ण लॉकडाऊन ९ जून पासून पुढे अजून दोन आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. मिझोराममध्ये आतापर्यंत कोरोनाचे ४२ रुग्ण सापडले आहेत. यापैकी एक रुग्ण बरा झाला आहे. तर राज्यात अद्याप ४१ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र, मिझोरामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.