HW News Marathi
Covid-19

बीडच्या पहिल्या कोविड-19 विषाणू चाचणी प्रयोग शाळेचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन

बीड | राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी(covid-19) साठी थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख हे देखील यावेळी उपस्थित होते.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर (सोशल डिस्टंन्सींग) पालन करुन सदर कार्यक्रम हा अतिशय साधेपणाने करण्यात आला.पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळालेल्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड – १९ विषाणू चाचणी प्रयोगशाळेस आवश्यक सामग्री तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची मान्यता मिळाली असून आजपासून प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होणार आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या संचालिका तथा मुख्याधिकारी मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी स्वाराती येथील या प्रयोगशाळेस मान्यता दिली असून कोविड – १९ चाचणी सुरू करण्यास अनुमती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील लोकांना लस देण्याऐवजी लसीचे डोस इतर देशांना दान करत आहोत, उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

News Desk

“पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि तुम्ही महाराष्ट्राला धमकी देतात?”

News Desk

असंघटीत क्षेत्रातील कामगारांना पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा

News Desk