HW News Marathi
Covid-19

अमरावतीत आरोग्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा भाजपने रोकला

अमरावती | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा आज (२५ सप्टेंबर) भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला होता. अमरावती जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्ण, वाढीव बिलं, बेडची कमतरता आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे भाजप युवा मोर्चाने अशाप्रकारे आंदोलन केलं. त्यामुळे राजेश टोपेंना रस्त्यात गाडी थांबवत त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावे लागले.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष प्रणित सोनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी राज्य शासनाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून कोरोना काळात उपाययोजना झाल्या पाहिजे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून भोंगळ कारभार लवकरात लवकर बंद व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.

दरम्यान राजेश टोपे यांनी अमरावती जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर,औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२४५ रुपयांच्या रॅपिड टेस्टिंग किटची खरेदी ६०० रुपयांना का?, विरोधकांचा केंद्र सरकारला सवाल

News Desk

“निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या”, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

Aprna

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने कोरोना वॉरियर्सचा सन्मान, जगासोबत कोणताही स्वार्थ न ठेवता उभा !

News Desk