HW News Marathi
राजकारण

हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? – निलेश राणे

मुंबई | बीडमध्ये तरुण मुलीवर अ‍ॅसिड झाल्यानंतर भाजपकडून सरकारवर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर टीका केली आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा गळा आता कुणी धरला आहे? असा प्रश्न विचारत भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. बीड अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. हाथरसवरुन राजकारण करणारे लोक आता कुठे गेले असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

राज्यात सातत्याने महिलांवर अत्याचार होत असताना राज्य सरकार काहीही पावलं उचलताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत अशीही टीका निलेश राणे यांनी केली आहे. बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला ऍसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.

निलेश राणे काय म्हणाले?

बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.

काय आहे प्रकरण?

दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट ( ता. बीड ) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच तरुणीवर अशा प्रकारे निर्दयी कृत्य घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणातील आरोपी व मयत तरुणी दोघे पुण्यात सोबत ( लिव्ह इन रिलेशनशिप ) राहत होते अशी माहिती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दहाव्या फेरीपर्यंत ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर

Aprna

एकनाथ शिंदेंनी आमदारांचे भावनिक पत्र केले ट्वीट

Aprna

इतरांच्या खुर्च्यांना टेकू देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही !

Gauri Tilekar