HW News Marathi
Covid-19

पालिकेने सुरू केलेला डॅश बोर्ड काम करत नसल्याच्या तक्रारी

मुंबई | मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच रुग्णालये बिले जास्त आकारत आहेत. आणि काही रुग्णालयांमध्ये बेड देखील उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. अशातच मुंबई महानरपालिकेने रुग्णालयात बेड कुठे आणि किती उपलब्ध आहेत याची माहिती देण्यासाठी एक डॅश बोर्ड तयार केला. मात्र, या डॅश बॉर्डची लिंक उघडल्यावर चालत नसल्याची माहिती समोर आली आहे.

पालिकेने दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर not found असा मेसेज येत आहे. दर अर्ध्या तासात बेड कुठे रिकामा झाला याची महिती या बोर्डवर देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले होते. मात्र असे काही घडत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा डॅश बोर्ड तयार करण्याचे काम सुरू होते. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी देखील माहिती दिली होती. आणि आता प्रत्यक्षात जेव्हा हा डॅश बोर्ड सुरू झाला तेव्हा तो सुरू होत नाही आहे.

कोरोना आणि कोरोना व्यतिरिक्तच्या आजारांसाठी कुठे, किती खाटा, किती भरल्या आहेत, किती रिक्त तसेच कोरोना संशयित पॉझिटिव्ह, आयसीयू, व्हेंटिलेटर, डायलिसिस खाटांची आणि कोरोना काळजी केंद्रातील खाटा यांची संख्या या डॅशबोर्डवर पालिकेकडून देण्यात येणार आहे. पालिकेच्या 1916 या हेल्पलाइनवर खाटांसाठी नोंदणी करता येईल, तसेच खाटा उपलब्धतेची माहिती घेता येईल.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपल्या जवळच्या वृत्तवाहिनीचे पितळ उघडे पडताच मदतीसाठी ‘भाजप’ची धडपड !

News Desk

“दादा लढवय्ये आहेत”, अजित दादांना कोरोना झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट!

News Desk

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील २७ जिल्ह्यांना प्रत्येकी १० लाख !

News Desk