HW News Marathi
Covid-19

स्वत: काही न करता सोनू सूदवर टिका,हाचं तुमचा माणुसकीचा धर्म का ?

मुंबई | राज्यातील या कोरोनाच्या संकटकाळात सरकारने अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत केली. विशेष रेल्वे, गाड्या सोडल्या. अशातच बॉलीवुडमधील कलाकार सोनू सूद या मजुरांसाठी धाऊन आला आणि त्यांना घरी जाण्यासाठी बस, रेल्वे, या सगळ्यांची सोय केली. त्याने केलेल्या या मदतीवर मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या आजच्या अग्रलेखातून टीका केली आहे. लॉकडाऊनच्या काळात एक नवा महात्मा आला असे त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या या टीकेवर आता भाजपकडून उत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, स्वत:ही करायचं नाही. सोनू सूदसारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत आहेत, त्यांचे कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत टीका करत आहेत. हाच तुमचा माणुसकीचा धर्म आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तसेच संपूर्ण महाराष्ट्रात हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक नाहीत, म्हणून लोक घरी तडफडून मरता आहेत. प्रत्येक घरात उपासमार सुरु आहे. मात्र तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही, दुसरे करतात त्यांना तरी तरी करु द्या. शिवसेना नेते संजय राऊत यांचे विधान दुर्दैवी आहे. स्वत:चं सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलं आहे. हे खरं सोनू सूदवर आरोप केल्याने लपू शकणार नाही असा टोलाही राम कदम यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन तेंडुलकरनंतर आता युसुफ पठाणलाही कोरोनाची लागण

News Desk

नौदलाची आयएनएस जलाश्व ही युद्धनौका मालदीवमध्ये दाखल

News Desk

पुण्यात ३ दिवस केवळ दुध आणि मेडिकल सेवाच सुरु राहणार

News Desk