HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधानांनी वटहुकूम काढून सरसकट पास करावे विद्यार्थ्यांना विद्यार्थी भारतीची मागणी

मुंबई | पंतप्रधान यांनी वटहुकूम जारी करावा व अपवादात्मक वर्षं म्हणून सर्वच राज्यातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना तसेच ATKT, BACKLOG च्या विद्यार्थ्यांना देखील सरसकट पास करून पुढील वर्गात प्रवेश दयावा तसेच राज्याचे राज्यपाल विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत नसतील त्यांची पदावरून हक्कलपट्टी करावी अशी मागणी राज्यद्याक्षा मंजिरी धुरी यांनी केली .परीक्षा घेण्याचा अट्टाहास असणाऱ्या राज्यपालांनी सांगावे 10 लाख विद्यार्थ्यांना कोरोना झालाच तर त्याची जबाबदारी ते स्वतः घेणार आहे का .? असे राज्यकार्यध्यक्ष प्रणय घरत यांनी विचारले.

आताच्या काळात कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे की परिक्षा घेऊन कोरोनाचे पेशंट कसे वाढतील हे बघितले पाहिजे तुमच्या गलिच्छ राजकारणात मुलांचा बळी देऊ नका असे राज्यकार्यवाह श्रेया निकाळजे यांनी म्हटले .आपला इस्त्राईल होऊ नये असे वाटत असेल तर परिक्षा रद्द करा . आणि जनतेला आता चांगलंच कळले असेल सत्तेसाठी हापापलेला भाजप पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो . त्यामुळे थोडी तरी जनांची नाय तर मनाची लाज वाटत असेल किव्हा माणुसकी असेल तर योग्य प्रकारे निर्णय घ्या. असे राज्य संघटक शुभम राऊत यांनी म्हटले .

आपल्या राज्यपालांना आपल्या हिताचा विचार करायचा नसेल तर आपल्या असे राज्यपालांना पदांवर काढून टाकण्यासाठी #राज्यपाल_हटवा_महाराष्ट्र_वाचवा ही मोहीम मोट्या प्रमाणात राबवावी लागेल . व या अश्या कसाई राज्यपालांना पदावरून हटवावेच लागेल असे राज्यसचिव जितेश पाटील यांनी म्हटले .त्याच बरोबर कोरोनाच्या काळात तरी देखील परिक्षा घेतल्या गेल्या तर विद्यार्थी भारती राज्यपालांच्या बंगल्यावर “झोप मोड आंदोलन ” करेल व परिक्षा वर देखील बहिष्कार टाकेल असे मंजिरी धुरी यांनी सांगितले आहे .राज्यपाल भाजपचा पोपट बनवून भूमिका निभावत असल्याचा आरोप राज्यप्रवक्ता अर्जुन बनसोडे यांनी केला आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंनी फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं, भाजपची खडसें विरोधात आक्रमक भूमिका!

News Desk

नांदगावच्या सेना आमदाराची भुजबळांशी खडाजंगी, त्यानंतर शिवसेनेची येवला मतदारसंघावर भगवा फडकवण्याची घोषणा!

News Desk

मध्य प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत OBC Reservation ला सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी

Aprna