HW News Marathi
Uncategorized

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना मातृशोक

मुंबई | केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचे आज (६ जून) सकाळी निधन झाले.पियुष गोयल यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. “आपल्या आपुलकीने प्रेमाने मला मार्ग दाखवणारी माझी आई चंद्रकांता गोयल यांचे आज सकाळी निधन झाले.

त्यांनी संपूर्ण जीवनभर लोकांची सेवा केली. तसेच त्यांनी मलाही लोकांची सेवा करावी अशी प्रेरणा दिली. देव त्यांना त्यांच्या चरणाशी जागा देवो, ॐ शांती,” असे ट्विट पियुष गोयल यांनी केले आहे.

चंद्रकांता गोयल या भाजपच्या नेत्या होत्या. त्या मांटुगा विधानसभा क्षेत्रातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. पियुष गोयल यांच्या ट्विटनंतर विविध पक्षातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघर जिल्ह्यातील गरीब जनतेच्या मदतीत विघ्न ?

News Desk

महिन्याभरापासून क्रुझवर अडकलेल्या भारतीय खलाशी,कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा

News Desk

आजम खान यांची जयाप्रदावर अश्लील टीप्पणी, राष्ट्रीय महिला आयोगाने बजावली नोटीस

News Desk