HW News Marathi
देश / विदेश

एमपीएससी म्हणजे कुठला चौकशी आयोग नाही, ज्याने इतका वेळकाढूपणा करत राहावा

नवी दिल्ली | कोरोनाच्या संकटामुळे अनेक परीक्षा रद्द केल्या तर काहींचे वेळापत्रक लांबणीवर गेले. अशातच स्थगित झालेल्या परीक्षेचे वेळापत्रक यूपीएससीने जाहीर केल्यानंतर एमपीएससीही याबाबत तत्परता का दाखवत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. एमपीएससी म्हणजे कुठला चौकशी आयोग नाही, ज्याने इतका वेळकाढूपणा करत राहावा, असे वक्तव्य काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी केले आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत असलेल्या आयोगाचे तुम्ही सदस्य आहात, अशीही आठवण सातव यांनी यावेळी आयोगाला करुन दिली आहे.

कोरोनामुळे यूपीएससीच्या परीक्षेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. पण यूपीएससीने काल (५ जून) वेळापत्रक जाहीर करुन विद्यार्थ्यांच्या मनातला संभ्रम दूर केला आहे. तसाच संभ्रम एमपीएससीनेही लवकरात लवकर दूर करावा अशी मागणी केली जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नालासोपारा येथे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

News Desk

मोदी सरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, म्हणाले एकाग्रतेकडे लक्ष द्या

swarit

वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल,मग बसा बोंबलत! – सामना

News Desk