HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraElections2019 : पहिल्या २ तासातील मतदानाची टक्केवारी

मुंबई | राज्यात १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज (२१ ऑक्टोबर) २८८ जागांसाठी मतदानाला सुरुवता झाली आहे. राज्यभरात ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील दिग्गज नेते मंडळींनी मतदानाला सुरुवात केली. मतदानाला सुरुवात झाल्यापासून सकाळी ८ वाजेपर्यंत जालना जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले आहे. जालनात सकाळपासून १० टक्के मतदान झाले आहे. तर लातूर शहरात ८ टक्के मतदान झाले आहे. तसचे मुंबई शहर ५ टक्के, मुंबई उपनगरात ५ टक्के, औरंगाबादतील ९ मतदार संघात – ७ टक्के सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यभरात एवढ्या टक्के मतदान झाले.

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सहकुंटुब मतदानाचा हक्क बजावला. तर केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांनी देखील सहकुटुंब मतदान मतदानाचा हक्क बजावला.

पहिल्या २ तासातील मतदानाची टक्केवारी

  • पुणे- जुन्नरमध्ये २२ टक्के
  • वाशिम जिल्ह्यात ६ टक्के
  • लातूर ग्रामीण – १० टक्के
  • जालना जिल्ह्यात – १० टक्के
  • अहमदनगरमध्ये – ९ टक्के
  • रायगडच्या अलिबागमध्ये – १२ टक्के
  • नाशिकच्या नादंगावमध्ये –
  • बीडच्या अष्टीच्या – १२ टक्के
  • मुंबई शहर सररासरी ५ टक्के
  • मुंबई उपनगरात ५ टक्के
  • नंदूरबार नवापूर – ७.५८ टक्के
  • ठाणे, कोपरी, पाचपखाडी – ५ टक्के
  • औरंगाबादतील ९ मतदार संघात – ७ टक्के

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदगाव परिसरातील औष्णिक विद्युत केंद्राची राख तातडीने उचलावी! – आदित्य ठाकरे

Aprna

कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात केंद्र सरकार वंचितांच्या पाठिशी उभे, तर राज्य सरकार… !

News Desk

पत्रकारावर हल्ला केल्यास तीन वर्ष शिक्षा-विधेयक मंजूर

News Desk