पुणे | महाराष्ट्रात कोरडा रुग्णांची संख्या वाढतच आहे. पुण्यात आज (३ जून) दिवसभरात नवे १७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यात नायडू-महापालिका रुग्णालयात ११०, खासगी ५३ आणि ससूनमधील १३ रुग्णांचा समावेश आहे. सध्या पुणे शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७,२६५ इतकी झाली आहे.
तसेच, शहरातील १५७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून यात नायडू-पुणे महापालिका १०२, खासगी रुग्णालय ४३ आणि ससूनमधील १२ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात आत्तापर्यंत ४,५०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती देत उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमला धन्यवाद दिले आहेत.
दिवसभरात १५७ रुग्णांना डिस्चार्ज, एकूण संख्या ४,५०५ !
शहरातील १५७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून यात नायडू-पुणे महापालिका १०२, खासगी रुग्णालय ४३ आणि ससूनमधील १२ रुग्णांचा समावेश आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद !
शहर डिस्चार्ज: ४,५०५ pic.twitter.com/QtbP4PGJ2f
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 4, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.