HW News Marathi
Covid-19

कोरोनाप्रमाणे ‘हे’ देखील संकट थोपवून मागे परतवू !

मुंबई | कोरोनाचे संकट थोपवले आणि परतवण्याच्या मार्गवर आहोत तसेच हेही संकट परतवू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला. आपण विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांचा निर्णय घेतला, पण आपली परीक्षा संपत नाही. राज्यात एकामागून एक संकट येत आहे. आता, निसर्ग चक्रीवादळाचा मोठा धोका असून उद्या दुपारपर्यंत अलिबागला हे वादळ येईल. त्यामुळे कोणीही पुढील दोन दिवस घराबाहेर पडून नका, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (२ जून) कोरोनाच्या संकटासंदर्भात राज्यातील जनतेशी संवाद साधला नाही. तर राज्यावर निसर्ग चक्रीवादळाबद्दल माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले.

सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या समुद्रात येत असून ते ताशी १०० ते १२० किमीच्या वेगाने येत आहे. आपण सज्ज असून आर्मी, नेव्ही, एनडीआरएफ आणि इतर तुकड्याही तैनात आहेत. गृहमंत्री अमित शहांचा काल (१ जून) फोन झाला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज (२ जन) फोनद्वारे केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी मदत मिळेल, असे त्यांनी आश्वस्त केल्याचे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सांगितले. या वादळामुळे पाऊसाची दाट शक्यता असून वीजप्रवाह बंद करण्याची गरज भासल्यास तसेही करण्यात येईल, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या संबोधणातील मुद्दे

  • वादळ उद्या दुपारपर्यंत किनारपट्टीवर धडकणार
  • हे वादळ कदाचित मोठं असेल
  • महाराष्ट्रातील यंत्रणा सज्ज, एनडीआरएफच्या तुकड्या तैनात
  • १२५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता
  • पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांकडून मदतीचे आश्वासन
  • अमित शहांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला
  • शिथिल केलेले निर्बंध उद्या बंद राहणार
  • सुरु करायच्या गोष्टी उद्या, परवा बंद राहतील
  • पुढील २ दिवस समुद्रकिनारी जाऊ नका
  • अनावश्यक विजेची उपकरणे वापरू नका
  • काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता
  • मुंबई ते सिंधुदुर्गापर्यंत प्रत्येक जिल्ह्याने सर्वतोपरी काळजी घ्या.
  • प्रशासन सज्ज, नागरिकांनी सहकार्य करावे

सूचना

  • घराबाहेर सुट्या वस्तू बांधून ठेवा, किंवा घरात आणा
  • मौल्यवान वस्तू, दस्तऐवज नीट ठेवा
  • विजेची उपकरणे, बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू चार्ज करून ठेवा
  • दूरदर्शन, आकाशवाणीच्या सूचनांकडे लक्ष द्या
  • तात्पुरत्या बांधकाम असलेल्या ठिकाणी आधाराला जाऊ नका
  • प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा
  • बीकेसीमधल्या रुग्णांना इतरत्र हलवले आहे
  • पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवा
  • अफवांकडे लक्ष देऊ नका
  • प्रशासनाने सूचित केलेल्या जागीच आडोसा घ्या
  • स्वतः सुरक्षित राहून मदत करणे शक्य असेल तर करा
  • उद्या आणि परवा हे २ दिवस महत्त्वाचे
  • जसे कोरोनाचे संकट थोपवले आणि परतवण्याच्या मार्गवर आहोत तसेच हेही संकट परतवू
  • संकटाच्या छाताडावर चाल करून जाऊया
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१९ जूनला पंतप्रधानांची सर्वपक्षीय बैठक, भारत-चीन संघर्षावर होणार चर्चा

News Desk

राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण

News Desk

पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी, महापौरांनी केली घोषणा

News Desk