HW News Marathi
देश / विदेश

BiharElection: तेजस्वी यादव यांनी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुसंडी मारली  

पाटणा | देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुसंडी मारली आहे. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल अर्थात RJD आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनने पहिल्या तासाभरातच बहुमताचा आकडा गाठला. हे सुरुवातीचे कल आहेत. त्यामुळे अंतिम निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
 
बिहारमधील विधानसभा निकालाच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. पहिल्या तासाभरात मतमोजणीच्या सुरुवातीपासून महागठबंधनची घोडदौड पाहायला मिळाली. यावेळी BJP आणि RJD मध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. यात 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला 243 जागांसाठी मतदान झाले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘ऑपरेशन कमळ’चे सूत्रधार केले आहे – सामना अग्रलेख

News Desk

४०० वर्ष जुन्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्र्यांचे केंद्रीय परिवहन मंत्र्यांना पत्र

News Desk

राहुल गाधींच्या वक्तव्याने मोदी झाले अवाक

News Desk