HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी खारघरमधील खड्डे प्रशासनाने भरले

नवी मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खारघरमध्ये आज (१६ ऑक्टोबर) सभा नुकतीच पार पडली. मोदींच्या सभेपूर्वी नवी मुंबईच्या खारघर आणि त्यांच्या जवळपासचे रस्त्यावरील मोठमोठे खड्डे भरण्यात आले. यामुळे मोदींच्या सभेमुळे का होईना पण, खारघरवासींच्या खड्ड्यांचा प्रश्न सुडला आहे.

खारघरमधील नागरिकांनी खड्ड्यांसाठी गेल्या कितेक दिवस सिडको आणि महापालिकेकडे तक्रार करुनही, ना प्रशासन लक्ष देत होते नव्हते. मात्र, आज मोदींच्या सभेनेत प्रशासनाचे डोळे उघडले आणि खारघरमधील रस्ते चमकले. रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे बुजवण्याची लगीनघाई जोरात सुरु आहे. मोदींमुळे का असेना, पण पाचवीला पुजलेल्या खड्ड्यांचं विघ्न दूर झाल्याची भावना वाहनधारकांमध्ये आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, गाठीभेठींचा सिलसिला सुरुच

News Desk

१२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

News Desk

शक्ती कायदा हिवाळी अधिवेशनात पारित होणार – गृहमंत्री वळसे-पाटील

News Desk