HW News Marathi
Covid-19

शाळा नाही तरी जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झालेच पाहिजे !

मुंबई | “जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करणे. तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे, तिथे त्या पद्धतीने का होईना, पण शिक्षण सुरू झाले पाहिजे. कोरोनासारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उपलब्ध ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र पुढील काळात विभागाची स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सद्य:स्थितीत गुगल क्लासरूमचा वापर सुरू करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “येत्या जूनपासून शिक्षण सुरू झाले पाहिजे. ऑनलाईन, ऑफलाईन, प्रिलोडेड टॅब अशा सर्व पद्धतीने शक्य आहे, त्या प्रमाणे शिक्षण सुरू व्हावे. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देऊ नये. दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरू करणे अडचणीचे आहे, त्या ठिकाणी इतर पर्यायांचा वापर करुन शिक्षण सुरू करावे. शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये”,असेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा मुकाबला करतांना कोरोना बाधित रुग्णाना क्वारंटाईन करण्यासाठी ज्या शाळा ताब्यात घेतल्या होत्या, त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल.

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष देण्याचे मान्य करुन, शिक्षकांना शिक्षणाशिवाय इतर कामे दिली जाऊ नये यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यावरही चर्चा झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा; कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा! – अजित पवार

Aprna

राज्यात आजही १४ हजारांच्या पुढे रुग्णांचा आकडा 

News Desk

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत धान्य मिळणार

News Desk