HW News Marathi
Covid-19

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण देणार | मुख्यमंत्री

मुंबई | राज्यातील परिस्थिती पाहाता, तातडीने परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यापूर्वी- जेवढे सेमिस्टर झाले आहेत त्याची सरासरी काढून गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करायचे ठरवले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी आज (३१ मे) राज्यातील जनतेला संबोधित केले आहे. राज्य सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यांत नियम शिथिल केले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“लॉकडाऊन हा शब्द आता कचऱ्याच्या टोपलीत फेकायची वेळ आलीये. आता ‘मिशन बिगीन अगेन’ सोबत नवीन सुरूवात करायची आहे,” असे म्हणत मुख्यमंत्री आज म्हणाले. पुनश्च हरी ओम… केल्यानंतरही काळजी घेणे अनिवार्य असून तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे बंधनकारक आहे. सध्या, पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने जास्त खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

 

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

  • जिथे शाळा सुरू करणे शक्य असेल तिथे शाळा सुरू होईल, जिथे शाळा अशक्य असेल तर ऑनलाईन
  • अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण दिले जाणार आहे
  • शाळा, कॉलेज कशी सुरू करणार, यावर विचार सुरू आहे
  • एसटीद्वारे सव्वा पाच लाख मंजुरांना सीमेवर सोडला आहे, रेल्वेने १५ लाख मंजूरांन त्यांच्या राज्यात सोडले.
  • पियुष्य गोयल यांना मुद्दाम धन्यवाद दिले, योगल यांनी ट्रेन दिल्याने मदत
  • रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येतात, दुखणे, अंगावर काढू नका, मुख्यमंत्र्यांची विनंती
  • संसर्ग रोखणे, तीव्रता रोखणे, मृत्यू दरात घट करणे हेच आमचे उद्दिष्ट
  • रुग्णांना बेड्स मिळत नाही यात काही प्रमाणात तथ्य आहे, पण बेड्स काढण्यास आम्ही पूर्ण प्रयत्न केले आहे, महाराष्टात ऑक्सिजनच्या बेडची संख्या वाढवत आहे. राज्यात आयसीयू बेड वाढण्यास आमचा भर
  • लॅब आणि चाचण्या वाढवणे ही आमची प्राथमिकता आहे. महाराष्ट्रात सध्या ७७ चाचणी केंद्र आहेत
  • पुढच्या रविवारपासून वृत्तपत्रे घरापोच मिळणार, वृत्तवितरण करणाऱ्या मुलांनी मास्क घालणे बंधनकारण आहे
  • महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान पाहून दु:ख वाटते आहे
  • महाराष्ट्रात आतापर्यंत २८ हजार जण बेर होऊ घरी घेले आहे, महाराष्ट्रात बरे होणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे व्हेंटिलेंटवर असलेल्या रुग्णांची संख्या फक्त २००वर आहे
  • लक्षणे आढळे तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा
  • घराबाहेर पडतना काळजी घ्या
  • जेष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये
  • आवश्यकता असेल तरच घरा बाहेर पडा
  • येत्या काही तासात समुद्र किनारी वादळ येणार आहे. यामुळे पश्चिम किनापट्टीवर लोकांनी त्यामुळे समुद्रात न जाण्याचे मुख्यमंत्र्यांचे मच्छीमारांना चार दिवस आवाहन
  • ८ तारखेपासून खासगी, सरकारी कार्यालये सुरू करणार आहे, कार्यालयात १० टक्के कर्मचाऱ्यांना परवानगी
  • ५ जूनपासून काही दुकाने सुरु करणार
  • ३ जनपासून हळूहळू अनलॉक करणार, बाहेर व्यायामाला परवानगी
  • राज्य पावसाळी आपत्तीसाठी सज्ज आहे
  • बाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक आहे
  • बाहेर फिरताना अंतर ठेवून बाहेर फिरावे
  • लॉकडाऊन हा शब्द आता कचऱ्याच्या डब्यात टाका
  • आपण पुन्हा एकदा आयुष्याची सुरुवात करत आहोत.
  • मिशन बिगीन अगेन म्हणजे पुनश्च हरीओम, लॉकडाऊन हे विज्ञान असेल, तर ते उघडणं ही कला आहे,म्हणून राज्यातील संबोधित करण्यास सुरुवात केली
  • प्रत्येक पाऊल टाकताना जपून टाकावे लागेल, काही बाबाती आपण सज्ज आहोत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामीण भागात ५०० नव्या रुग्णवाहीका देण्यात येणार 

News Desk

वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले, राऊतांनी दिल्या राज ठाकरेंना शुभेच्छा !

News Desk

नव्या वर्षाचं नागरिकांना गिफ्ट,  WHOकडून  फायझरच्या लसीला मान्यता

News Desk