HW News Marathi
महाराष्ट्र

यंदाचं नागपूरमधील हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार?

नागपूर | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक महत्वाच्या बैठका, कार्यक्रम, सण, उत्सव नेहमीप्रमाणे होऊ शकलेले नाहीत. नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशनही मुंबईत घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना संकटामुळे बिझनेस अॅडव्हायजरी कमिटीच्या बैठकीलाही उशीर झाला होता. हिवाळी अधिवेशनाची तयारी करण्यासाठी कोरोनामुळे वेळ मिळत नाही, त्यामुळे यंदा हे अधिवेशन मुंबईत घेतलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले याबाबत सरकार आणि विरोधी पक्षाशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर नागपूरचं आमदार निवास कोविड सेंटर म्हणून वापण्यात आलं होतं. त्यामुळे याठिकाणी राहण्यास काही आमदार विरोध करत असल्याचंही बोललं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा पुण्यात फिरकू न देण्याचा इशारा, संजय राऊत थेट वडगाव शेरीत मेळावा घेणार!

News Desk

दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान करायला नको होते !

News Desk

अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ! – एकनाथ शिंदे

Aprna