HW News Marathi
Covid-19

राज्यात तब्बल १,४२१ पोलिसांना ‘कोरोना’ची तीव्र लक्षणे

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. अशातच आता पोलीस दलात वाढणारा कोरोनाचा संसर्ग पाहता राज्य सरकार आणि प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. राज्यात आज ( ३१ मे) तब्बल ९१ पोलिसांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे राज्यातील तीव्र लक्षणे आढळलेल्या कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा एकूण आकडा आता 1,421 वर जाऊन पोहोचला आहे. या सर्वांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळते.

मुंबई पोलीस दलाकडून आज (31 मे) कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा जाहीर करण्यात आला. यावेळी, तीव्र लक्षण असलेल्या पोलिसांचाच आकडा जाहीर करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह पण सौम्य लक्षणे असलेल्या पोलिसांचा आकडा देण्यात आलेला नाही. राज्यातील एकूण 1,421 तीव्र कोरोनाची लक्षणे आढळलेल्या कोरोनाबाधित पोलिसांपैकी 183 पोलीस अधिकारी तर 12,238 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेेश आहे. या सर्वांमध्ये कोरोनाची अत्यंत तीव्र लक्षणं दिसून आल्याची माहिती मिळते.

स्वतःचा जीव धोक्यात घालून राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस दलात कोरोनाचा वाढता संसर्ग हे निश्चित राज्य सरकारपुढचे मोठे आव्हान आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा २४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले!

News Desk

“मोदींना ना कोरोना आवरता येतोय ना सत्ता”, काँग्रेसची टीका

News Desk

राज्यात नवे ७८ पोलीस ‘कोरोनाबाधित’ तर २०० पोलीस ‘कोरोनामुक्त’ 

News Desk