HW News Marathi
Covid-19

राज्यात नवे ७८ पोलीस ‘कोरोनाबाधित’ तर २०० पोलीस ‘कोरोनामुक्त’ 

मुंबई | राज्यातला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. राज्य सरकारपुढे हे प्रचंड मोठे आव्हान आहे. त्यातच या बिकट स्थितीतही स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांना सुरक्षा देणाऱ्या राज्याच्या पोलीस दलातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. आजच्य (२४ मे) दिवसात राज्यातील पोलीस दलातील तब्बल ८७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात एकूण १७५८ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एक अत्यंत दिलासादायक बाब अशी कि याच एका दिवसात २०० पोलीस कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा वाढत आकडा जरी चिंतेत भर टाकत असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा अत्यंत दिलासादायक आहे.

राज्यात शनिवारी (२३ मे) एकाच दिवसात राज्यातील पोलीस दलातील नवे ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली होती. तर आजच्या दिवसात थेट या कोरोनाबाधितांच्या आकड्यात तब्बल 87 ने वाढ झाली आहे. तर कालच्या दिवसांत २ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा देखील १८ वर पोहोचला आहे. दरम्यान, त्यातील एक अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे या एकाच दिवसात २०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोनमुक्त होऊन आपल्या घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांचा आकडा ६७३ वर पोहोचला आहे. यात ५१ अधिकारी तर ६२२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना ३ महिन्यांचे अनुदान आगाऊ मिळणार

News Desk

नुकत्याच ‘कोरोना’मुक्त झालेल्या लातूरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव

News Desk

CAPF च्या मागणीला केंद्राकडून मान्यता, राज्यात २० तुकड्या होणार दाखल

News Desk