कराड | कमल ३७०चा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही हे म्हणणे चुकीचे आहे, असे म्हणत भाजपचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना टीका केली आहे. मला इतके वाईट वाटेत की, या लोकांना या मातीचे देशाच्या सक्षणासाठी काय योगदान आहे, यांची सुद्धा जान नसावी हे खऱ्या अर्थाने दुदैव आहे. अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांना सडेतोड उत्तर दिले.
भोसले पुढे असे देखील म्हणाले की, यशवतंराव चव्हाण ही कराडची ओळख आहे. यशतवंतराव चव्हाण हे देशाचे सरक्षण मंत्री, देशाच्या हिमालयाच्या सरक्षणाला सह्याद्रीला केला, अशी त्यांची आठवण काढतात. साताऱ्या जिल्ह्यातील सर्वात जास्त लोक सैन्यात भरती झाली झाले असून ते देशातील सक्षणसााठी ४२ हजार शहीद झाले आहेत. यात महाराष्ट्रातील सातरा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचा समावेश जात आहे.
काश्मीर हा एका राज्यापुरता मर्यादीत नाही तर देशातील एकत्मकता आणि अंखडता राहायची असे तर देश आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा यांच्या संबंध येतो. महाराष्ट्राची कलम ३७०ची संबंध नाही हे तुम्ही म्हणून कसे कशता. या गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये दिवाळी साजरी झाली नाही. देशात एक झेंडा तर काश्मीरमध्ये दोन झेंडे, देशासाठी एक संविधान तर काश्मीरमध्ये दुसरे संविधान आहे.भारतामध्ये एक नियम आणि काश्मीरमध्ये दुसरा नियम, असे असू शकत नाही. देशाला महासत्ता बनयाची स्वप्न बघायची असेल, देशला प्रगती करायची असेल तर आणि सगळ्या देशाला एका व्यासपीठावर आण्याचे असेल तर कलम ३७० हटविणे हे गरजेचे आहे. तर त्यामुळे महाराष्ट्राचा कलम ३७०ची काही संबंध नाही हे सांगणे म्हणणे चुकीचे आहे.
आमच्या सरकार कलम ३७० देशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे. आम्ही याचे राजकारण करत नाही. हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. देशाच्या हितासाठी कलम ३७० हटविले असून हे देशातील जनतेला सांगणे काही चुकीचे नाही, असे भोसले यांनी एच. डब्ल्यू मराठीशी बोलताना सांगितले.
कलम ३७० बद्दलची तुमची भूमिका पहिली स्पष्ट करा !
तुम्ही आधी सांगा की तुम्ही कलम ३७० च्या बाजुचे आहा की, विरोधातील हे पहिले सांगा, तुमची भूमिका पहिली स्पष्टकरा, असा सवाल भोसले यांनी एच. डब्ल्यु.मराठीशी बोलताना त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना केला आहे. येत्या २४ ऑक्टोबरला एकादशीच्या दिवशी निकाल येईल तेव्हा सर्व गोष्टी स्पष्ट होईल माझा विश्वास आहे की, ते निवडणूक तर ते हारणार आहेत. पण, ते दोन नंबरला सुद्धा राहतील की नाही ही परिस्थिती त्यांच्यावर परिस्थिती आली नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.