ऑस्ट्रिया | ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये ६ ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये २ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ऑस्ट्रियाचे चॅन्सलर सेबॅस्टियन कुर्झ यांनी हा ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचं म्हटलं. पोलिसांकडून एक हल्लेखोर मारला गेला असून दुसऱ्या हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचं ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहमा यांनी सांगितलं आहे.
व्हिएन्नाच्या मध्यवर्ती स्विडनप्लाट्स स्क्वेअर इथं गोळीबार करण्यात आला. पण हल्लेखोरांचे लक्ष्य नेमकी हीच जागा होती का, हे अद्याप स्पष्ट झालं नाही आहे. “गोळीबारात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्या एका जखमी महिलेचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, ” अशी माहिती महापौर मायकल लुडविग यांनी दिली आहे. हॉस्पिटलमध्ये आणखी १४ जणांवर उपचार सुरू असून यापैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती मिळत आहे. गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक पोलीस अधिकारीही गोळीबारात जखमी झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.