HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरमधून निवडून येणार होतात तर… छगन भूजबळांची पाटलांना कोपरखळी

नाशिक | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात कालपासून वाद सुरु आहे. यात आता राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी उडी घेतली आहे. कोल्हापूरमधून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णी यांचा अधिकार का डावलला? असा खोचक प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटीलयांना डिवचलं आहे. कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं चॅलेंज चंद्रकांत पाटलांनी काल दिलं होतं. तर हसन मुश्रीफ यांनीही चंद्रकांत पाटील यांना हिमालयात जाण्याची गरज नाही त्यांची इते गरज आहे असं म्हणत टोमणा मारला होता.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर उपस्थित होते. यावेळी भुजबळ बोलत होते.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

“मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुणे हा सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती.” असं चंद्रकांत पाटील काल म्हणाले होते.

चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरऐवजी पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढवली होती. तत्कालीन भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करुन चंद्रकांतदादांना सीट देण्यात आली होती. हा विषय त्यांच्यासाठी नेहमीच त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जातात. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या आमदारांशी बातचीत केल्यानंतर मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटणार!

News Desk

नाशिकच्या कांद्या व्यापाऱ्यावर आयकर विभागाचे छापे, कांद्याचे दर पन्नास टक्क्यांनी घसरले

News Desk

मुंबईत मुसळधार पाऊस, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प

News Desk