HW News Marathi
राजकारण

सुशीलकुमार शिंदे माझ्या पक्षासंदर्भात हे बोलू शकत नाहीत !

जळगाव | “सुशीलकुमार शिंदे स्वतःच्या पक्षासंदर्भात सांगू शकतात. माझ्या पक्षासंदर्भात सांगू शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मी आहे. त्यामुळे, सुशीलकुमार शिंदेंपेक्षा मला माझ्या पक्षाची स्थिती जास्त चांगली माहित आहे”, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे विधान थेट फेटाळून लावले आहे. “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस आता थकले असून भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार”, असे विधान सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर, शरद पवार आज (९ ऑक्टोबर) बोलत होते.

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघेही थकले आहेत. कधीकाळी आम्ही एका आईच्या मांडीवर वाढलो आहोत. आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही (शरद पवारांच्या) मनात खंत असेल, मात्र ते बोलून दाखवत नाहीत. भविष्यात आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतो”, असे विधान सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. यासंदर्भात एका पत्रकाराने शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे स्पष्टपणे नाकारले आहे. “मला माझ्या पक्षाची स्थिती सुशीलकुमार शिंदेंपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने माहित आहे. ते त्यांच्या पक्षाबद्दल सांगू शकतात पण माझ्या नाही”, असे शरद पवार म्हणाले.

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून (८ ऑक्टोबर) शरद पवार हे ३ दिवसीय निवडणूक प्रचार दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान, बुधवारी सकाळी जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांचे हे विधान पूर्णपणे फेटाळून लावले आहे. लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रचंड मोठा धक्का बसला. लोकसभेनंतर एकीकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षानी म्हणजेच राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी आपल्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तर राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरु झाले. त्यामुळे, आता या दोन्ही पक्षांना या निवडणुकीमध्ये आपल्या अस्तित्त्वासाठी लढावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बजरंग दलाचे सर्मथक, कन्हैया कुमारमध्ये हाणामारी

swarit

रश्मी ठाकरेंनी टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेऊन केली आरती; ठाकरे गट- शिंदे गटाचा सामना टळला

Aprna

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सोमय्यांवर भडकल्या

News Desk