HW News Marathi
महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या नावांची यादी मुख्यमंत्री आज राज्यपालांना देणार

मुंबई | विधानपरिषदेसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. आज (२ नोव्हेंबर) विधानपरिषदेसाठी १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस महाविकासआघाडीकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली जाणार आहे. या नावांची यादी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करणार आहेत. बंद लिफाफ्यात कोणती नावं आहेत? तसेच राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना तात्काळ मंजुरी देणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

तर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावमध्ये बोलताना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावे ठरल्याची माहिती दिली आहे. मात्र, ही नावे गुपित आहेत ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्यवेळी ती नावे आम्ही जाहीर करण्यात येणार असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांच्या हिंदुत्वाच्या वादानंतर ही नावे लगेच निश्चित होणार का? आणि ती नावे कोणती असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवाजी पार्कमध्ये नारायण राणेंचे बॅनर हटवले!

News Desk

राणा दाम्पत्याची मुख्यमंत्री, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

Aprna

कोल्हापुरातील जोरदार पावसामुळे राधानगरी, कोयनासह अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग

News Desk