HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापुरातील जोरदार पावसामुळे राधानगरी, कोयनासह अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर | गेल्या महिन्यात पुरामुळे कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापुरात पुराचे सावट आले आहे. कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणचे काल (७ सप्टेंबर) सात स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून ११३९६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून राधानगरी धरणातून ५ स्वयंचलित दरवाज्यातून ८५४० क्युसेक, कोयनेतून ७०४०४ क्युसेक तर अलमट्टी धरणामधून १८२००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज (८ सप्टेंबर) सकाळी १० वाजात्या सुमारास राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पाणी पातळी ३८.५ फूट इंच होती. या जिल्ह्यातील ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर ८.३६ टीएमसी पाणीसाठा आहे.

पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर ही ७ बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे हे ५ बंधारे पाण्याखाली आहेत. तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी हे ३ बंधारे पाण्याखाली आहे. कासारी नदीवरील करंजफेण, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ- तिरपण, ठाणे -आवळे व यवलुज हे ६ बंधारे पाण्याखाली आहेत. कुंभी नदीवरील शेणवडे, कळे (खा), वेतवडे, मांडुकली, सांगशी व कातळी हे ६ बंधारे पाण्याखाली आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृत मलमची निर्मिती करणाऱ्या शैलेश जोशींची आत्महत्या

News Desk

अजित पवारांच्या दौऱ्यात बदल, कोल्हापूरऐवजी सांगलीला झाले रवाना

News Desk

ईडी, सीबीआयकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही – संजय राऊत

News Desk