HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालनियुक्त १२ जागांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर, राज्यपालांकडे लवकरच पाठवणार प्रस्ताव

मुंबई | विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त १२ जागा भरण्याच्या प्रस्तावावर आज (२९ ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लवकरच पाठवला जाणार आहे. यावर राज्यपाल काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण सध्या मंदिर पुन्हा सुरु करण्यावरुन नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये पत्रांतुन वाद झालेला सगळ्यांनी पाहिला आहेच. त्यामुळे ते काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे.

राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या जागा भरण्यासाठी महाविकासआघाडीच्या गोटात हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये विधानपरिषदेवर स्वत:ची वर्णी लावण्यासाठी नेत्यांमध्ये शर्यत सुरु झाली होती. यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी ४ उमेदवारांची निवड होणार आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांकडे १२ सदस्यांची यादी कधी पाठवणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाप-बेटे घरी बसून आहेत. पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही – नारायण राणे

News Desk

बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज : खा.अशोक चव्हाण

News Desk

चिल्लर खाऊन डॉलर पवारांकडे जमा करणाऱ्यालाच राष्ट्रवादी गृहमंत्रीपद देते!

News Desk