HW News Marathi
महाराष्ट्र

‘होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा’ अहिल्यादेवींच्या वंशजांची गंभीर टीका

सांगली | अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन वाद सुरु झाला होताच. आता तो वाद एका नव्या वळणाला गेला आहे. होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा असल्याचा आरोप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी केला आहे. आपण जर माहिती घेतली तर जेजुरी परिसरात हे लोकं प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे होळकरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत, हे दिसेल. त्यासाठी हा उद्योग सुरु आहे, असा गंभीर आरोप भूषणसिंह होळकर यांनी केला आहे. संभाजीराजे छत्रपती जर उद्याच्या जेजुरी मधील कार्यक्रमाला जाणारच असतील तर त्यांनी अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करावं. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते जर अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण झले तर आम्ही त्याचे स्वागतच करू, असे होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी म्हटलं आहे. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून भूषणसिंह होळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या आडून बहुजन समाजात दुही माजवण्याचे राजकारण सुरू असून आज (१३ फेब्रुवारी) पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला छत्रपती संभाजीराजे यांनी जाऊ नये, अशी पत्राद्वारे विनंती केली असल्याचे भूषण सिंह होळकर यांनी सांगलीमध्ये बोलताना सांगितले आहे. तसेच या पुतळ्याचे अनावरण बहुजन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या हस्ते होऊ नये, या गोष्टीला आमचा विरोध असून छत्रपती संभाजी महाराज जर त्या कार्यक्रमाला जाणार असतील तर त्यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणे योग्य ठरेल, त्याला आमचा विरोध असणार नाही, पण होळकर घराण्याच्या संस्कृतीचा आणि ७०वर्षांपासून बहुजन समाजाचा राजकारणासाठी वापर केलेल्या व्यक्तीकडून अनावरण झाल्यास देशभरातील बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जातील, असेही भूषणसिंह होळकर यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे आज अनावरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर भूषण सिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडून अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे काल अनावरण

जेजूरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं असल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुन काल पहाटे चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाला होता. यानंतर पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाड शहरात ५ मजली इमारत कोसळली, ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता 

News Desk

हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी; धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे – अजित पवार

News Desk

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी होणार मोदींच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक..!

News Desk