HW News Marathi
महाराष्ट्र

मराठी भाषेची चीड येते असे बोलणाऱ्या जान कुमार सानूवर मनसेचा हल्लाबोल!

मुंबई | सध्या बिग बॉसचा १४वा सीझन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले. दरम्यान, हा भाग प्रकाशित झाल्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.

“माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते,” असं जान कुमार सानू म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर मनसेच्या अमेय खोपकर यांनी कठोर शब्दात इशारा दिला आहे. “जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,” असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.

“मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,” असं म्हणत खोपकर यांनी जान सानू याला धमकीवजा इशारा दिला आहे.

 

काय आहे प्रकरण?

जान कुमार सानू बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये सहभागी झाला आहे. दरम्यान अभिनेत्री निक्की तंबोळी त्याच्यासोबत हिंदी ऐवजी मराठी भाषेत संभाषण करत होती. त्यावेळी जान कुमारने तिला मराठी बोलण्यापासून रोखलं शिवाय मराठी भाषेवर टीके देखील केली. मला मराठी भाषा आवडत नाही. माझ्याशी मराठी भाषेमध्ये बोलू नकोस. मराठी ऐकताच माझ्या डोक्यात तिडीक जाते असं म्हणत त्याने निक्की समोर आपला संताप व्यक्त केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मराठी भाषिक या वक्तव्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतातील लस उत्पादकांकडून होणारा लसींचा व्यापार थांबवा, नाना पटोलेंची केंद्राकडे मागणी

News Desk

“ST महामंडळाच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव झालेला नाही!”

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला – नाना पटोले

News Desk