HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी केली पराग शहांच्या गाडीची तोडफोड

मुंबई | भाजपने आज (४ ऑक्टोबर) चौथी यादीर जाहीर केली आहे. प्रकाश मेहता हे भाजपकडून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या यादी भाजपेचे माजी मंत्री प्रकाश मेहता यांना डावलून नगरसेवक पराग शहा यांना घाटकोपर पूर्वमधून पक्षाने उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर मेहता यांच्या समर्थकांने शहा यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे घाटकोपरमधील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

प्रकाश मेहता हे १९९० पासून घाटकोपर पूर्वचे आमदार म्हणून निवडणून आले आहेत. युती सरकारच्या दोन्ही कालखंडात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. गृहनिर्माणसारखे महत्त्वाचे खाते आणि ज्येष्ठ मंत्र्यांत समावेश असल्याने प्रतिमा उजळविण्यास मोठी संधी होती. मात्र, एसआरए प्रकल्प, इमारतीचा पुनर्विकास, नियमबाह्य दिली जाणारी परवानगी आणि त्यातील टक्केवारी याबाबत सातत्याने त्यांच्यावर आरोप होत राहिले. प्रकाश मेहता यांची राजकीय कारकीर्द नेहमी वादग्रस्ताच्या भोवऱ्यात अडकलेली आहे.

कार्यकर्त्यांचा संताप

प्रकाश मेहताऐवजी पराग शहा यांना घाटकोपर पूर्वमधून उमेदवारी देण्यात आली. यामुळे मेहतांच्या संतप्त कार्यकत्यांनी शहा यांना शिवीगाळ करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. प्रकाश मेहता, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणाही हे संतप्त कार्यकर्ते देत होते. कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी प्रकाश मेहता आणि किरीट सोमय्या यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ईलेक्ट्रिक बसचं उदघाटन!

News Desk

मोदींचे २०२२ चे स्वप्न आम्ही २०१९ मध्येच पूर्ण करू !

Gauri Tilekar

दरवर्षी नियोजन सांभाळणारे मंत्री कराड नेमके कुठे राहिले?

News Desk