HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षाला देणगी देणारे दाते मिळवण्यात राष्ट्रवादी ठरली यशस्वी!

मुंबई | महाराष्ट्रात नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वात मोठं राजकीय नाट्य घडलं. शिवसेनेने भाजपची साथ सोडत २ पक्षांची साथ हाती घेतली. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. या सरकारचं नेतृत्व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वानुमते देण्यात आलं. तसेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

महाविकास आघाडीच्या सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. असं असलं तरी आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष निधी मिळवण्यात मोठी झेप घेतली आहे. पक्षाला देणगी देणारे दाते मिळवण्यात राष्ट्रवादी चांगलीच यशस्वी झाली असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झालं आहे.

निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या देणगी अहवालानुसार, २०२०-२१ साली भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मालकीच्या लोढा डेव्हलपर्सने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५ कोटींची देणगी दिली. राजकीय पक्षांना दरवर्षी २० हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळाल्यास त्याची आकडेवारी निवडणूक आयोगाला सादर करावी लागते.

आर्थिक वर्ष २०१९-२०२० मध्ये राष्ट्रवादीच्या पक्ष निधीमध्ये ५९.९४ कोटी रुपयांची भर पडली आहे. २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात ही आकडेवारी १२.०५ कोटी होती. म्हणजेच नोव्हेंबर २०१९ मध्ये सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निधीत जवळपास पाच पट वाढ झाल्याचे समोर आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिकाऱ्यांच्या अंगावर चिखल ओतणारेही तुमच्याच पक्षाचे होते, गडकरींच्या पत्रावरून भास्कर जाधवांची टीका!

News Desk

युपीए अध्यक्ष पदाबाबत शरद पवार म्हणाले तर आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही – संजय राऊत

News Desk

“खरे सूत्रधार ‘सिल्व्हर ओक’ आणि ‘वर्षा’वर बसलेत”, भाजपचा घणाघात

News Desk