HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांविरोधात देशमुख यांना उमेदवारी

मुंबई । विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर काल (४ ऑक्टोबर) करण्यात आली आहे. या यादीत १९ उमेदवारांची नावे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूरमधून काँग्रेसने विरोधात आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नंदुरबार आणि सिल्लोडमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला आहे. यासोबतच कणकवली मतदारसंघातून सुशील राणे यांना तिकीट देण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाची पहिली यादी २९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे यांच्यासह ५१ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत ५२ उमेदवारांचा समावेश केला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी असा पक्षाचा आग्रह होता. मात्र, चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणातच राहणे पसंत केल्याने त्यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदार संघातून हे दोघे बंधू धीरज देशमुख आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांच्या मनात पुन्हा विश्वास जागविण्यासाठी काँग्रेसचा ‘महाराष्ट्र्र दौरा’

News Desk

ईडी कार्यालयात चौकशीला का जाणार नाही याचे खडसेंकडून स्पष्टीकरण!

News Desk

लॉकडाऊनमध्ये शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी, पालकांकडून शिक्षण शुल्क भरण्याची सक्ती करू नये !

News Desk