HW News Marathi
Covid-19

बीड जिल्ह्यात ८ नवे कोरोनाबाधित, सर्वच जण मुंबई-पुण्याहून आलेले

बीड | बीड जिल्ह्यात कोरोना हळूहळू हातपाय पसरू लागल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी (१९ मे) जिल्ह्यातून ६६ संशयितांचे स्वॅब‌ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आज (२० मे) त्यापैकी ८ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत तर ५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित ३ जणांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. गेवराई, माजलगाव पाठोपाठ बीड आणि केज तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण मुंबई आणि ठाणे शहरातून बीड जिल्ह्यात आलेले आहेत.

कोरोना पाॅझिटीव्ह आलेल्या रुग्णांपैकी ६ जणांचे स्वॅब बीडच्या तर २ जणांचे केजच्या रुग्णालयातून पाठविण्यात आले होते. यापूर्वी मुंबई येथून आलेल्या गेवराई तालुक्यातील इटकुर येथील १२ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली होती. तिच्या आईचाही (वय ३५) अहवाल आता पाॅझिटीव्ह आला. बीड शहरातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात मोमीनपुरा येथील २ तरुण (वय २२ आणि २४ वर्षे) आणि सावता माळी चौकातील तिघे (वय १४, १६ आणि ३६ वर्षे) यांचा समावेश आहे. हे ५ जण ठाण्याहून बीडला आले होते. केज तालुक्यातील दोघांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले असून त्यात चंदन सावरगाव आणि केळगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश असून ते दोघे मुंबईहून परतले होते.

बीड जिल्ह्यात यापूर्वी कोरोनाचे १२ रुग्ण सापडले होते. त्यापैकी १ उपचारानंतर बरा झाला, तर एका वृद्धेचा मृत्यू झाला. त्यानंतर ६ जणांना पुण्याला हलविण्यात आले होते. उर्वरित ४ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. आज ८ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १२ झाली आहे. आजवर बीड जिल्ह्यात सापडलेले सर्वच्या सर्व २० कोरोनाबाधित परजिल्ह्यातून आलेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मरकजवाल्यांना गोळ्या घालुन ठार मारलं पाहिजे,राज ठाकरे कडाडले !

News Desk

महाराष्ट्रात एक कोटी ‘बाहुबली’; लसीकरणासाठी महाराष्ट्र आघाडीवर

News Desk

कोरोना रोखण्यासाठी समन्वयाने काम करा,अजित पवारांचे पुण्यात निर्देश!

Arati More