HW News Marathi
Covid-19

HW Exclusive : जाणून घ्या… अमोल मिटकरी यांनी ५३ लाखांची संपत्ती कशी मिळवली

मुंबई | विधानपरिषदेच्या सदस्त्वाचा अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात अमादर अमोल मिटकरी यांनी ५३ लाख संपत्ती दाखवली. अमोल मिटकरी हे सर्व सामन्या कार्यकर्ता आहे तर यांच्याकडे ऐवढी संपत्ती कशी असा प्रश्न सर्वाच्या चर्चा विषय बनला आहे. यासंदर्भ आमदार अमोल मिटकरी यांनी एच. डब्ल्यू. मराठीशीच्या मुलाखतीत त्यांच्या ५३ लाखच्या संपत्ती कशी आहे. मिटकरी यांनी ही संपत्ती कशी मिळवली यांच्या सविस्तर उलघडा त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे.

अमोल मिटकरींना त्यांच्या संपत्तीवर प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, विधानपरिषेदेचा अर्ज भरताना ५३ लाख यापैकी ४ एकर शेती आहे. त्यांची किंमत पाच लाखाप्रमाणे त्यांचा हिशोब केला तर ती २० लाखाची आहे. ही चार एकर जमीन माझ्या वडिलांनी मला दिली आहे. या २० लाखांपैकी ३३ लाख शिल्लक राहिले यात १० लाख हे गृह कर्ज आहे. हे जर वगळले तर राहतात २३ लाखमध्ये ८ लाख कार लॉन आहे. राहतात ते १५ लाखमध्ये ३ लाख रुपये क्रॉप लोन म्हणजे शेतीवरचे कर्ज आहे. मग राहतात १२ लाख ऐवढे वर्ष चळवळीत आहे. घरचा हात थोडाफार असतोच आणि मध्यवर्गीयांकडे ऐवढे असतात, असे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

दरम्यान, हा प्रश्न कोणी आसाराम बापू, नरेंद्र महाराज किंवा रामदेव बाबा यांना कोणी विचारणार नाही. तुम्ही किती शेती करता. मात्र, महात्मा फुले. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणार नेहमी भिकारी असावा असे लोकांना का ?, असा सवाल आणि खंत आमदार अमोल मिटकरी यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला. अंधश्रद्ध पेरणाऱ्या बुवा महाराजांचा भरमसाठ पैसा त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे कोणतीही शेती नसते ते लोकांंना मुर्ख बनवतात. मी महाराष्ट्रात लोकांनी मला मान, धन दिले. धन कमी आणि मान खूप जास्त दिला आहे. धनाची अपेक्षा घेऊ, मी कधी फिरलो नाही. मी माझ्या मेहनतीच्या जोरावर १२ ते १३ लाखाची संपत्ती मिळवली आहे.

फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांची संपत्ती

माझ्या प्रतिज्ञापत्र पाहाताना त्यांनी माझी संपत्ती किती आहे. हे पालिले, पण मी किती कर्जबाजारी आहे. सरकार माझे आहे. डॉ.बाबासाहेब आणि गाडगे महाराजांचे विचार सांगणार माणून यांचे मरण हे एका चौपाटीवर बेवारससारखे त्यांच्यावर अत्यंस्कार व्हावे. मी महात्मा फुले. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणार माणूनस आहे. आणि त्यांनी मला चांगले विचार करण्यास शिकविले आहे. मी माझ्या वाणीचा उयोग वैध मार्गातून पैस कमविण्यासाठी केला आहे. लोकांची मानसिकात झाली की, राजकारण हे लोक पैसा खाण्यासाठी असते. पण मी याला अपवाद होऊ दाखवले. येणार कळात हा प्रत्येक गोष्टीचे उत्तर असेल. टीकेला मी कधी भिक घालत नाही. माझ्याकडे आंबानीसारखी संपत्ती नाही. पण फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांची संपत्ती आहे. यांचा मला अभिमान आहे.

संपूर्ण मुलाखत पाहा

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नफेखोरी करणाऱ्या मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा !

News Desk

महाराष्ट्राचा ॲाक्सिजन गुजरातला पळवण्याचा प्रयत्न ,कट आला उघडकीस !

News Desk

राज्यात आज ८,२३२ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk