HW News Marathi
Covid-19

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. या आधी त्यांना लागण झाल्याची माहिती येत होती. मात्र, तेव्हा त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याची माहिती त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दिली होती.”माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,”,अशी माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. अजित पवारांनी शनिवारी 18 ऑक्टोबरला अतिवृष्टी झालेल्या बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती.

 

दुसरी महत्वाची बाब म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जेव्हा अजित पवार क्वाॉरंटाईन झाले त्यानंतर लगेचच फडणवीसांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यावरुन अनेक चर्चांना उधाण आले होते. तसेच, २३ ऑक्टोबरला ज्येष्ठ नेत एकनाथ खडसे यांनी भाजप सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्याच्या आदल्या दिवशीच अजित पवार क्वॉरंटाईन झाले होते. तेव्हाही खडसे राष्ट्रवादीत येत असल्याने अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना सुरु झाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, यूजीसीकडून परीक्षांसाठीची कार्यपद्धती (SOP) जाहीर

News Desk

अमित देशमुख यांनी या कारणासाठी घेतली राज्यपालांची भेट

News Desk

Pravin Darekar HW Exclusive : केंद्रानेही राज्याला आर्थिक मदत केली पाहिजे, भाजपची प्रामाणिक भावना !

News Desk