HW News Marathi
Covid-19

अमित ठाकरेंचे पुन्हा या कारणासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई |कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या संकटाच्या काळात पोलीस, डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहे.अनेक डॉक्टर, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आले आहे. मात्र अनेकांप्रमाणे आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्या मानधनात कपात केल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे.

राज्यभरातील डॉक्टरांचे कितीही आभार मानले तरीही अपुरेच आहेत, इतकं उत्कृष्ट काम शासकीय सेवेतील डॉक्टर्स निष्ठेने करत आहेत. या डॉक्टरांना देण्यात येणारं मानधनात सरकारने कपात करणं हे कोणत्याही दृष्टीने पटणार नाही, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं आहे. नव्या आदेशानुसार त्यांच्या पगारात सुमारे 20 हजार रुपये कपात होणार आहे. या आदेशामुळे तरुण डॉक्टरांच्या मनात असंतोषाचे वातावरण असून ही मानधन कपात अन्यायकारक असल्याचं अमित ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे.

वैद्यकीय अधिकारी आणि नर्सेस यांना त्यांचे पूर्वीचेच वेतन देण्याबाबत आपण त्वरीत कार्यवाही करावी, अन्यथा कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर्स आणि नर्सेस हे योद्धे आहेत या आपल्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही असा टोलाही मनसे नेते अमित ठाकरे यांनी लगावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत १०७४ जण कोरोनामुक्त

News Desk

ज्यांचा पराभव होणार असतो ते आधीच तयारी करतात…! जयंत पाटलांनी डिवचलं

News Desk

रोजगार मिळवून देणाऱ्या या कंपनीतून ९६० कर्मचारी गमावणार आपलीच नोकरी

News Desk