HW News Marathi
Covid-19

रोजगार मिळवून देणाऱ्या या कंपनीतून ९६० कर्मचारी गमावणार आपलीच नोकरी

नवी दिल्ली | जगात कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले. लॉकडाऊन जारी केला आणि उद्योग, कंपनी बंद झाल्या. या सगळ्यात देशाचे आर्थिक नुकसान खूप झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. लोकांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांना देखील आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. लाखो लोकांना नोकरी देणाऱ्या एका कंपनीने त्यांच्याच कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे.

मायक्रोसॉफ्ट कॉर्प.ची प्रोफेशनल नेटवर्किंग साईट असणाऱ्या लिंक्डइन (LinkedIn) ने त्यांच्या ९६० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनकडून जगभरातील त्यांच्या ६ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्यात येणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे रिक्रूटमेंट प्रोडक्ट्सची मागणी कमी झाली आहे. अनेक कंपन्या LinkedIn चा वापर योग्य उमेदवाराचा शोध घेण्यासाठी करतात, तर उमेदवार या प्लॅटफॉर्मचा वापर नवीन नोकरी शोधण्यासाठी करतात. सेल्स आणि हायरिंग डिव्हिजनधील कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमवावी लागेल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनु सूदवरून महाविकासआघाडीतले मतभेद उघड !

News Desk

राज्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्तीवर चर्चाच झाली नाही! – अजित पवार

Aprna

कल्याण-डोंबिवलीमध्ये ही लॉक डाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!

News Desk