HW News Marathi
महाराष्ट्र

उध्दव ठाकरे तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, राणे पुत्रांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात अनेक विषयांवर भाष्य केले आणि विरोधकांना चोख उत्तरे देखील दिली. तसेच, गेले अनेक दिवस भाजप नेते नारायण राणे आणि त्यांचे २ पुत्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत होते त्याचाही त्यांनी. काल समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणे पितापुत्रांवर केली होती. त्यानंतर नारायण राणेंचे दोन्ही पुत्र चांगलेच खवळले आहेत. माजी खासदार निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल 1 वाक्य, पण बिहारवर 20 मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो”, असं ट्विट निलेश राणेंनी केले आहे.

“दुसऱ्यांची पिल्लं वाईट…मग त्यांनी काय DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रावणबाळ” जन्माला घातला आहे का? अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पोलिसांवर कुठलाही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन द्या.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” अशी टीका नितेश राणे यांनी अधिकृत ट्विटरवरुन केली. “बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते. जास्तच हवा भरलेली आज, किती आव, ‘टाचणी’ तैयार आहे.. फक्त योग्य वेळ येऊन द्या,” अशी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झाला, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. राज्यात काहीजणांना माणसांची इंजेक्शन्स लागू पडत नाहीत. त्यांना गुराढोरांची इंजेक्शन्स लागतात.

गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी टीकासुद्धा उद्धव ठाकरेंनी केली होती. काही लोकांना सत्तेचे स्वप्न पडत आहेत. अनेक दिवसांपासून सत्ता पाडण्याचं ऐकत आहे. हिंमत असेल तर सरकार पाडा, आम्ही तुमच्या सारखे गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाहीत. वाटेला जाल तर काय ते दाखवून देऊ, असं आव्हानच त्यांनी नाव न घेता राणेंना दिलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते !

News Desk

ज्यांच्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो आणि नाईट लाईफमध्ये खुलतो ते… 

News Desk

ठाकरे सरकारकडून अनेक नावांची शिफारस, केंद्राने प्रदान केला फक्त एक पद्म!

News Desk