HW News Marathi
महाराष्ट्र

आहेराचे पैसे बापाने पळवले आणि मोजून देतो सांगितले, GSTवरून केंद्रावर मुख्यमंत्र्यांची टीका

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्या निमित्त लोकांशी संवाद साधला. राज्य सरकारने केंद्राकडे जीएसटीचे थकलेले पैसे मागण्यात काहीही गैर नाही. आम्ही हे पैसे मागितले तर भाजप नेते टीका करतात. तुम्ही लग्न केलं आणि आता बापाकडे पैसे कशाला मागता, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले. मात्र, माझा बाप केंद्रात नाही. तो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो. माझा बाप महाराष्ट्रा हाच आहे, माझ्या विचारातून आणि कृतीतून वेळोवेळी त्याचे अस्तित्त्व तुम्हाला दिसून येईल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्राकडून वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसानभरपाईच्या थकित रक्कमेवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत भाजप नेत्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. रावसाहेब दानवे म्हणतात, तुम्ही लग्न केलं आणि आता बापाकडे पैसे कशाला मागता? पण मला त्यांना हे सांगायचं आहे की, आमच्या लग्नात आलेला आहेर बापाने पळवून नेला. आहेराचे पैसे मोजून परत देतो, असे त्याने सांगितले. मात्र, अजूनही बाप पैसे मोजतच बसलाय, अशी खोचक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्तेसाठी लाचारी म्हणजे नारायण राणे”- विनायक राऊत

News Desk

राहुल गांधींविरोधात दापोलीतून तालुक्यातून याचिका दाखल!

News Desk

समन्वयातून सीमावाद सोडवावा! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Aprna