HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या बंडखोर माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

नाशिक | विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना भाजप-शिवसेनामध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरीला सुरुवात झाली आहे. भाजप उमेदवारांची पहिल्या यादीत जागा न मिळलेल्या सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज (२ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

युतीमध्ये ही सिन्नरची जागा सोडण्यात आली आहे. शिवसेनेचे विद्यमान राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यासह एबी फॉर्म दिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी भाजपत बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली होती. भाजपने त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टीही केली. तेव्हापासून माणिकराव कोकाटे कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते. आता कोकाटे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला असून त्यांना सिन्नर येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मेल्यावर साहेबांना काय सांगू? मुख्यमंत्री शिवसेनेचा पण…”, शिवसेनेला आमदाराचा घरचा आहेर 

News Desk

अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल

News Desk

राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर

News Desk