HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या ‘या’ विद्यमान आमदारांचा पत्ता कट ?

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज (१ ऑक्टोबर) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, यादी मुक्ताई नगरचे आमदार एकनाथ खडसे, आणि घाटकोपर पूर्वचे आमदार प्रकाश मेहता यांना भाजपच्या या तीन महत्त्वाच्या नेत्यांचे तिकीट कापण्यात आले आहे. या तिघांचे नाव नसल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना १२४ जागांवर आणि भाजप १६४ आणि मित्रपक्ष १८ जागांवर लढणार आहे. तसेच शिवसेनेला विधानपरिषदेच्या दोन अधिकच्या जागा दिल्या जातील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढविणार आहे. तर कोथरूड मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादी ५२ आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

तसेच १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. या यादीत १२ महिलांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपध्ये आलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचे नावही पहिल्या यादीतून वगळण्यात आले आहे. तर, अपेक्षेप्रमाणे उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

 

भाजपच्या यादीत उमेदवारांची नावे नाहीत

  • मुक्ताई नगर – एकनाथ खडसे
  • घाटकोपर पूर्व – प्रकाश मेहता
  • मुलुंड – सरदार तारा सिंह
  • पुणे कॅन्टॉन्मेंट – दिलीप कांबळे
  • शिवाजी नगर – विजय काळे
  • कोथरुड – मेधा कुलकर्णी
  • माजलगाव – आर टी देशमुख
  • आर्णी – राजू तोडसम
  • विक्रमगड – विष्णू सावरा
  • शहादा – उदेसिंग पाडवी
  • मुखेड – गोविंद राठोड

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळण्याच्या धास्तीने केंद्र सरकारकडून हे दबावतंत्र, खडसेंच्या ईडी चौकशीवर मिटकरींची प्रतिक्रिया

News Desk

हंगामी अध्यक्ष पदावरून काँग्रेस-भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चुरस

News Desk

“संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, आणि सामना देखील वाचत नाही”

News Desk