HW News Marathi
महाराष्ट्र

खडसेंनी भाजप सोडल्यानंतर उदयनराजे म्हणतात राज्याची सुत्रे ताब्यात घेण्यासाठी फडणवीसांना शुभेच्छा !

सातारा | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणाचे चित्र पालटण्याची चिन्ह दिसत आहे. त्यातच राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत, ‘लवकरच चांगले घडेल’, असे सूचक विधान केले आहे.

उदयनराजे भोसले हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलमध्ये महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे

‘राज्याची सूत्र ताब्यात घेऊन एक चांगल्या प्रकारच शासन महाराष्ट्रात लागू करण्याकरिता देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना शुभेच्छा देतो, असं म्हणत उदयनराजे यांनी आगामी काळात राजकीय भूकंप घडणार असल्याचे संकेत दिले आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या. पण, राजकारणामुळे त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले आहे. सरकार कुणाचे पण असू द्या, पण स्थिरता असेल तरच शासन करू शकतो, असंही उदयनराजे म्हणाले.

‘महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार हवे आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, लवकरच काही तरी चांगले घडेल आणि लोकांची जी काही प्रश्न आहे, ती सुटणार आहे, असं सूचक विधानही उदयनराजेंनी केले आहे. त्यामुळे आता भाजप पुढे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यात नौदलाचे लढाऊ विमान कोसळले, सुदैवाने पायलट बचावले

News Desk

जनता मराठीतून कामकाज करणार आणि अधिकाऱ्यांना इंग्रजीची मुभा देणार का? – आशिष शेलार

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोलापूर दौऱ्याला सुरुवात

News Desk